वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात नर बिबट्या कैद झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले,परंतु देवळाली कॅम्प भागातील जुनी स्टेशन वाडी येथील चौधरी मळ्यात मादी बिबट्या व तिचे बछडे याच भागात मोकाट आहेत.एक नर बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात कैद झाल्याचे मयूर चौधरी यांना निदर्शनास आले.देवळाली कॅम्प भागातील जुनी स्टेशन वाडी येथे नेहमीप्रमाणे शेती काम करण्यासाठी मळ्यात गेलेले असताना बिबट्याने डरकाळी फोडली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत बिबट्याला ताब्यात घेतले आहे.