सैलानी येथे 22 ऑगस्टच्या रात्री शेख नफिस उर्फ बाब्याची चाकू भोसकून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.पोलिसांनी काही तासातच 3 आरोपींना अटक केली होती.आज आरोपींना न्यायालयात हजर केले असता 26 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मृतक बाब्याने सैलानी परिसरातील अवैध धंद्याबाबत तक्रार केली होती म्हणूनच त्याची हत्या करण्यात आली असा,आरोप मृतकाच्या भावाने केला आहे.