उमरेड येथील जनार्दन अड्याळवाले यांच्या ज्वेलर्सच्या दुकानात दोन आरोपींनी त्यांचे लक्ष विचलित करून तीन लाख 82 हजार 352 रुपये किमतीचे 120 ग्राम सोने 30 डिसेंबर 2024 रोजी चोरून नेले होते याप्रकरणी उमरेड पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील फरार आरोपी मोहम्मद अली लिकायत अली याला राजस्थान येथून अटक करण्यात आली त्याने हा गुन्हा त्याच्या साथीदार अब्बास अली इस्लाम अली याच्या मदतीने केल्याचे कबूल केले.