गंभीर गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या आरोपीला खंडणी विरोधी पथकाने संत कबीर नगर येथे कोंबिंग ऑपरेशन दरम्यान ताब्यात घेतले आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली.कोंबिंग ऑपरेशन सुरू असताना पोलिसांना पाहून एकाने पळ काढल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव राहुल उर्फ बंटी राजकुमार भारती असे असून पंचवटी पोलीस ठाण्यात त्याच्यावर गंभीर गुन्हा दाखल आहे.