गणेश चतुर्थीच्या पावन दिवशी आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी गणरायाचे आज दि २७ आगस्ट ला १० वाजता मंगल आगमन झाले. यावर्षीचे हे ९६ वे वर्ष असून, जोरगेवार कुटुंबीयांनी १९३० पासून ही परंपरा जपली आहे. आता त्यांच्या चौथ्या पिढीने ही पवित्र परंपरा पुढे नेली आहे.