बीड ते अहिल्यानगर राज्य महामार्गावरील घाटपिंपरी शिवारात एक भीषण अपघात घडला. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. राहूल अशोक कोकरे (वय २६, रा. घाटपिंपरी, ता. आष्टी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राहूल कोकरे हा धामणगाव येथे काही कामानिमित्त गेला होता. काम आटोपून तो आपल्या दुचाकीवरून गावाकडे परतत होता. तो घाटपिंपरी गावाजवळ पोहोचत असताना अचानक एका वळणावर त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि अपघात झाला