निम्नदुधना प्रकल्पातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने, मानवत टाकळी निलवर्ण या गावच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने सदर रस्ता वाहतुकीसाठी अनेक दिवस बंद रहात असल्याने ग्रामस्थांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे, पाणी कमी झाले तरी पुलावरून पाणी वाहत असताना ही ग्रामस्थांना जीवधोक्यात घालून पुलावरून प्रवास करावा लागतो, त्यामुळे याठिकाणी उंच पूल तयार करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.