दिनांक 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान जुना मोंढा नांदेड येथे, यातील आरोपी मनोज गंगाधर कस्तुरकर, वय 54 वर्षे, रा. चौफाळा व इतर दोन आरोपी हे विना परवाना बेकायदेशिररित्या कल्याण नावाचा मटका जुगार खेळत व खेळवित असतांना नगदी 2230/-रू व जुगाराचे साहित्यासह मिळून आले. फिर्यादी पोकों विलास शिवराम कदम, ने. पोस्टे वजिराबाद यांनी दिलेल्या फिर्यादवरुन वजीराबाद पोलीस स्टेशन मध्ये आरोपी मनोज कस्तुरकर विरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल असुन तपास पोहेकों नंदे, हे करीत आहेत.