खामगांव तालुक्यातील भालेगाव बाजार येpथील ३२ वर्षीय युवकास कुलरचा शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना ४ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजे दरम्यान उघडकीस आली आहे.प्रवीण प्रकाश इंगळे यांच्या घरी कुलर चालू होता. घरामध्ये गारवा झाल्यामुळे प्रवीणने कुलर बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कुलरमध्ये वीजप्रवाह असल्याने त्याच्या तीव्र झटक्याने प्रवीण जागेवर कोसळला. त्यास सामान्य रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.