एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या कसनसूर परिसरातील नागरिकांनी मंजूर झालेल्या 33 केव्ही सब-स्टेशनचे काम अद्याप सुरु न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करत तातडीने काम सुरु करत पूर्ण करण्यात यावे, या मागणीसाठी माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांना निवेदन दिले.गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडून 33 केव्ही सब-स्टेशनला मंजूरी मिळुनही प्रत्यक्ष काम सुरु झालेले नाही.