गोंदिया: जागतिक डास दिनानिमित्त जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने एक माहितीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी मा. डॉ. अभिजीत गोल्हार यांच्या हस्ते करण्यात आले. सर रोनॉल्ड रॉस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.