परवा कुप्पा येथील कुंडलिका नदीपात्रातून वाहून गेलेला अक्षय बाबासाहेब जाधव (वय २८, रा. कुप्पा) यांचा मृतदेह अखेर आज सकाळी सापडला आहे. सकाळी अंदाजे 08 वाजता दुकडेगाव बंधाऱ्यात हा मृतदेह आढळून आला. परवा अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात अक्षय जाधव वाहून गेला होता. या घटनेनंतर दोन दिवसांपासून प्रशासन, पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम सुरू होती. नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने शोधकार्याला अडचणी येत होत्या.