धुळे शहरातील देवपूर नेहरू चौक परिसरातील सार्वजनिक मुतारी जीर्णावस्थेत असून स्लॅब कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. गांधी पुतळा ते विटा भट्टी मार्गावरील ही एकमेव मुतारी असल्याने येथे नेहमी गर्दी असते, त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. मुतारी तात्काळ पाडून नवी उभारावी, अशी मागणी असून पाठपुराव्यानंतरही महानगरपालिका उपाययोजना करत नसल्याने नागरिक संतप्त आहेत.