लातूर -शहरातील नांदेड रोड डालडा फॅक्टरीच्या परिसरात असलेल्या जुन्या शिरोळकर बिल्डींगमधील प्लास्टीक पिशव्यांच्या गोडाऊनवर लातूर शहर महापालिकेचे उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकली असता या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात बंदी असलेले प्लास्टीक पिशव्या आढळून आल्या. सदर गोदाम सील करण्यात आले असल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले.