अकोला शहरातील टिळकरोड बियाणी चौक मार्गावर महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे मोठा अनर्थ घडला आहे. अनेक महिन्यांपासून उघडे असलेले भूमिगत गटार झाकले न गेल्याने आज जोरदार पावसात एका व्यक्तीचा तोल जाऊन तो गटारात पडला आणि तो बेपत्ता झाला आहे. या दरम्यान, त्याचवेळी वसंत देसाई स्टेडियमजवळ महापालिकेचा मोठा विद्युत पोल रस्त्यावर कोसळून एक नागरिक किरकोळ जखमी झाला.