जनतेला लागणारे शासकीय प्रमाणपत्र कमी खर्चात व लवकर मिळावे तसेच बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावे म्हणून राज्य शासनाने "सेतू केंद्र" वाटप केलेले आहे.परंतु काही सेतू चालक मूळ कागदपत्रात खाडाखोड करत आहे,तसेच इतर ठिकाणी सेतू चालवत नियमांचं सर्रास भंग करीत असून एकाने तर चक्क नायब तहसीलदाराची खोटी सही व शिक्का मारल्याची गंभीर बाब उघडकीस आल्यानंतर बुलडाणा उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांनी नियम मोडणारे बुलडाणा तालुक्यातील 2 सेतू केंद्र कायमचे बंद करण्याचे आदेश काढले आहे.