“गणपती बप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया” अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण जिल्हा दुमदुमून गेला. लाडक्या गणरायाच्या आगमनाने बीड जिल्ह्यातील गावागावांत आणि शहरातील प्रत्येक गल्लीबोळात आनंदाचे वातावरण पसरले आहे. घरोघरी पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली असून, भक्तांनी विधीवत पूजा-अर्चा करून बाप्पाचे स्वागत केले. सकाळपासूनच बाजारपेठेत सजावटीच्या वस्तू, फुलं, फळं, व पिठाचे पदार्थ खरेदीसाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.