अकोल्यातील मोरणा घाटावर यंदा गणेश विसर्जनाचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. सकाळपासूनच भाविक भक्त आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी घाटावर गर्दी करणार असून, यासाठी प्रशासन आणि महानगरपालिकेने विशेष तयारी केली आहे.यावर्षी मोरणा घाटावरील एकूण ७ विसर्जन कुंडांवर गणेश विसर्जन होणार आहे. प्रत्येक कुंडाजवळ सुरक्षेची आणि स्वच्छतेची काटेकोर व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी घाट परिसरात पुरेशी प्रकाशयोजना तसेच मार्गदर्शनासाठी स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली