शेर्ले - सिद्धार्थनगर येथील शंकर रामा जाधव यांच्या घराची दगडी भिंत आज पहाटे कोसळली. या घटनेत दैव बलवत्तर म्हणून त्यांच्या पत्नी आणि मुलगी बचावल्या आहेत. दगड पायावर कोसळून पायाला किरकोळ दुखापत झाली. या घटनेत जाधव कुटुंबीयांचे सुमारे ७० ते ८० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. अशी माहिती सावंतवाडी तहसील कार्यालयातून सोमवार ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता देण्यात आली.