कोयत्याच्या धाकावर नातेवाईकांना ओलीस ठेवणाऱ्या अट्टल गुन्हेगारास पनवेल पोलिसांनी शिताफीने अटक करून ओलीसांची सुटका केली आहे. पनवेल शहर पोलीस ठाणे येथे एक इसम हा मंगला निवास, गोडसे आळी, जुने तहसीलच्या समोर असलेल्या भाडेकरुच्या घरामध्ये कुलुप तोडुन त्याचे आई-वडील, भाऊ व भावाची 3 मुले यांच्यासह हातामध्ये कोयता व कुन्हाड घेऊन घरात धुसुन बसलेला होता.