कुरुंदवाड पोलिसांनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन वेगवेगळ्या ठिकाणी जुगार अड्ड्यांवर छापे टाकून दोन जुगार चालकांना आज शनिवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता अटक केली आहे.या कारवाईत एकूण ३,३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, यामध्ये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य समाविष्ट आहे.पहिली कारवाई दत्तवाड येथील खंडोबा मंदिरासमोरील एका खोलीत करण्यात आली.येथे जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ धाड टाकली.