सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज शुक्रवार १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ ते ६.३० यावेळेत वेंगुर्ले तहसील कार्यालयात जनता दरबार घेतला. यावेळी आलेल्या निवेदनातील तक्रारींपैकी काही तक्रारी संबंधित विभागाच्या वतीने तात्काळ सोडवल्या. तर काही तक्रारी सोडवण्याबाबत योग्य त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. वेंगुर्ले मध्ये आज सुरुवात झाली यापुढे जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयात जनता दरबाराद्वारे लोकांचे प्रश्न सोडवण्यात असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.