– महात्मा फुले मंडई परिसरातील बाबु गेणू गणपती दर्शनाला आलेल्या महिलेला गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने सुमारे ४५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली येथील ४० वर्षीय महिला दरम्यान बाबु गेणू गणपती दर्शनासाठी आल्या होत्या. यावेळी गर्दीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र धारदार वस्तूने कापून चोरून नेले.