कटफळ ता.सांगोला येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जनाबाई रंगा चव्हाण यांची निवड झालेली आहे. या निवडणुकीत सरपंच अश्विनी सोमनाथ सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर सरपंच पदासाठी नवीन निवडणूक घेण्यात आली. त्यावेळी ही निवड करण्यात आली. निवडीनंतर सांगोला येथील माजी आमदार दिपक साळुंखे पाटील यांच्या संपर्क कार्यालयात नव्या सरपंचांचा सत्कार माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी आबांनी गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले.