मुंबईत रस्त्यांवर झालेल्या मोठ्या प्रमाणात खड्ड्यांवरून मनसे आक्रमक झाली आहे. मनसेच्या वतीने आज शुक्रवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता चांदिवली मध्ये अनोखे आंदोलन करण्यात आले. एनएसएस रोड वर पडलेल्या खड्ड्यात उभे राहून मनसेने आंदोलन केले. या वेळी स्थानिक नागरिक या खड्ड्यांमुळे जखमी झाले आहेत, होऊ शकतात याचे प्रतीकात्मक रूप म्हणून जखमी कार्यकर्ते इथे उभे करण्यात आले.