धनगर समाजाविषयी मनोज जरांगे पाटील यांनी जो अपशब्द वापरला त्याचा धनगर समाजाच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला. याबाबत सांगोला येथील धनगर समाजाचे सामाजिक कार्यकर्ते आर. वाय घुटुकडे यांनी शहरातील राजमाता अहिल्यादेवी होळकर पुतळ्यासमोर माध्यमांशी संवाद साधला. सदरचा संवाद हाच 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास साधण्यात आला. त्यांनी ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नका,नाहीतर आमच्या समाजाकडून तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहे.