बीड तालुक्यातील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या श्रीक्षेत्र कपिलधार येथे मुसळधार पावसामुळे धबधब्याने रौद्ररूप धारण केले आहे. या भागातील सतत सुरू असलेल्या पावसामुळे धबधब्यात प्रचंड पाण्याचा विसर्ग होत असून परिसरात प्रचंड पाणी वेगाने कोसळत आहे. त्यामुळे येथील निसर्गसौंदर्य अधिक खुलून दिसत असले तरी त्याचबरोबर धोका देखील वाढला आहे. पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी कपिलधार येथे नेहमीच पाहायला मिळते. मात्र सध्या पाण्याचा जोर वाढल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.