हिंगणघाट शहरात पर्यावरण संवर्धन समितीच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात फलकाचे अनावरण करून ‘तुळसबाग’ तयार करण्यात आली. या निमित्ताने आमदार समिरभाऊ कुणावार यांनी उद्यान परिसरात तुळशीची अनेक रोपे लावण्यात आली तसेच नागरिकांना 108 तुळशीची रोपे देण्यात आली आमदार कुणावार म्हणाले की. तुळशीचे धार्मिक, सांस्कृतिक आणि औषधी असे तिहेरी महत्त्व आहे. घराघरात तुळशीचे रोप असणे हे केवळ श्रद्धेचे द्योतक नसून आरोग्य संवर्धना आहे असे मत व्यक्त केले.