माथेरान घाटातील अपघातांची मालिका सुरूच असून शुक्रवारी पुन्हा एक नवीन अपघात घडला. जुमापट्टी स्थानकाच्या वरील वळणावर कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली.एका नामांकित वाहन निर्मिती कंपनीच्या कारची ट्रायल टेस्टिंग सुरू असताना हा अपघात झाला. घाटातील धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जाऊन लोखंडी सुरक्षा रेलिंग तोडत थेट खड्ड्यात अडकली.