भाजप आमदार चित्रा वाघ यांनी गुरुवारी दुपारी ३ वाजता काँग्रेसवर जोरदार टीका केली. त्यांनी आरोप केला की काँग्रेसची छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची द्वेषभावना पुन्हा एकदा उफाळून आली आहे. बेंगलुरूतील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव बदलून सेंट मेरी करण्याची मागणी काँग्रेस आमदार रिझवान यांनी केली आहे. इतकेच नाही तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या नामांतराचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. यावर महाराष्ट्र काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करणार की गप्प बसणार, असा सवाल वाघ यांनी उपस्थित केला.