दुपारच्या सुमारास उपवन तलाव परिसरामध्ये तीन मुले फिरण्यासाठी गेली होती. त्यामध्ये एका दहा वर्षाच्या चिमुरड्याचा समावेश होता. फिरायला गेलेले असताना दहा वर्षाचा राज चाबुकस्वार नावाचा चिमूरडा पोहण्यासाठी तलावात उतरला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्यात बुडाला. माहिती मिळतात सर्व टीम आणि कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले आणि एक तासानंतर त्याला बाहेर काढण्यात आले. मात्र रुग्णालयात नेला असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केलेला पाहायला मिळाला.