कोल्हापूर जिल्ह्यात गणेश उत्सव काळात गणेश मंडळांनी वेळेचं आणि आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्यात 452 जणांवर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खटले दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयातील विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. दरम्यान यात कोल्हापूर शहर विभागातून 151, तर करवीर उपविभागातून 62 जणांवर खटले दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.