कोरेगाव मतदारसंघामध्ये अगदी तरुण वयामध्ये होणारे अकाली मृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अन्नामध्ये कृत्रिम रंग वापरल्याने मोठ्या प्रमाणावर आरोग्याचे प्रश्न निर्माण होत असून कर्करोग आणि हृदयरोग आदी जीवघेण्या रोगांचा प्रवेश शरीरात होत आहे, हे रोखण्यासाठी अन्नक्षेत्राशी व्यवसायाच्या मार्गाने निगडित असणाऱ्या सर्वांनी पुढाकार घ्यावा आणि कृत्रिम रंगाचा वापर न करण्याचा निर्धार करावा, असे आवाहन आ. महेश शिंदे यांनी सोमवारी दुपारी साडेबारा वाजता केले.