तुमसर तालुक्यातील पवनारा टोली येथे दि. 28 ऑगस्ट गुरुवारला सायं. 5 वा. तुमसर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी जितेंद्र अशोक नागदेवे याच्या हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर धाड घालून आरोपीच्या ताब्यातील 35 लिटर हातभट्टीची दारू असा एकूण 3 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये आरोपी विरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.