भंडारा तालुक्यातील आंबेडकर वार्ड गणेशपुर येथील तेजस सुनील घोडीचोर वय 21 वर्षे याला पोलीस अधीक्षक भंडारा यांच्या आदेशाने दिनांक 29 मे 2025 रोजी भंडारा जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले होते. सदर हद्दपार असलेल्या आरोपी तरुणाने पोलीस अधीक्षक भंडारा यांच्या आदेशाचे उल्लंघन करून भंडारा शहरातील गांधी चौकात दिनांक 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.45 ते 8.45 वाजता दरम्यान गणेश विसर्जन मिरवणूक दरम्यान हजर मिळून आल्याने त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला.