भडगांव परिसर तसेच उत्तर महाराष्ट्रास वरदान असलेल्या गिरणामाईचे महादेवाचे बांबरूड येथे गिरणा - तितर नदी संगमावर ऋषीपंचमीचे औचित्य साधत शाही स्नान करत यशस्विनी सामजिक जनजागृती अभियान महिलांनी खण नारळाची ओटी भरून जलपूजन केले. गिरणा आईची कृपा सदैव अशीच रहावी व गिरणा नदी बारमाही संथ, निर्मळ प्रवाहित रहावी यासाठी नदीपात्रात जाऊन अभियान प्रमुख शेतकरी संघाच्या संचालिका तथा माजी नगरसेविका योजना पाटील, मनिषा पाटील, रेखा शिरसाठ, निता भंडारकर, सुनिता पाटील, मिनाक्षी पाटील आदी महिलांनी शेतकरी बांध