मेहकर तालुक्यात सतत पडलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. विशेषतः जुलै, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक पिके आणि फळबागा पूर्णत उद्ध्वस्त झाल्या. दि 27/9/25 रोजी सायंकाळी मुसळधार पाऊस वार्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.कासारखेड 20हेक्टर पेनटाकळी 15 हेक्टर गजरखेड 5 हेक्टर अतिवृष्टीमुळे उसाची उभी पिके आडवी पडून गेली आहे.ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले .