तुमसर पोलिसांनी २४ सप्टेंबर रोज गुरुवारला दुपारी ४ वा.च्या सुमारास हसारा रोडवर मोठी कारवाई करत एका व्यक्तीला अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. आरोपीकडून एक स्कोर्पिओ गाडी, मोबाईल फोन आणि अवैध शस्त्र असा 4 लाख 10100 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भुपेंद्र श्यामराव बिंझाडे (वय ३०, रा. सुंदरटोला, ता. तुमसर, असे आरोपीचे नाव असून हा पोलिसांना दखलपात्र गुन्हा करण्याच्या बेतात संशयीतरित्या दिसून आला याप्रकरणी आरोपी विरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे