लातूर -मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या सभागृहात लातूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांची बैठक उत्साही वातावरणात आयोजित करण्यात आली. मराठवाडा जागरण समितीच्या वतीने ही बैठक संयोजक आणि जिल्हा परिषद माजी सदस्य नामदेव पाटील व मोईज भाई शेख यांच्या टीमने यशस्वी केली. अशी माहिती आज दिनांक 31 ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.