महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी मागील दोन ते तीन महिन्यांपासून वेतनविना काम करीत आहेत. या परिस्थितीमुळे अनेक कर्मचार्यांना आर्थिक अडचणींसह मानसिक तणावाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महावितरण कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन तात्काळ राष्ट्रीयकृत बँकेद्वारे अदा करावे, दिवाळी बोनस द्यावा यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य स्वतंत्र विद्युत कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने आज शुक्रवार 3 ऑक्टोबर रोजी महावितरण कार्यालयासमोर आंदोलन.