नागाव येथील वीर जवान विजय कराडे (वय 21) यांच्यावर आज मंगळवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता शोकाकुल वातावरणात नागाव येथे त्यांच्या शाळेच्या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पार्थिवावर हजारो नागरिकांनी जड अंतकरणाने अखेरचा निरोप दिला.शनिवार, दि 6 सप्टेंबर रोजी चंदिगड येथे कर्तव्य बजावत असताना अपघात होऊन गंभीर जखमी झालेल्या विजय कराडे यांच्यावर उपचार सुरू असताना दुर्दैवाने त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या निधनाने संपूर्ण नागावसह पंचक्रोशीतील गावांमध्ये शोककळा पसरली.