जालना स्थानिक गुन्हे शाखेने दोन अट्टल गुन्हेगारांना जेरबंद केले असून 64 हजार 892 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या दोघांनी आतापर्यंत केलेले 5 घफोडीचे तर 2 डिझेलचोरीचे गुन्हे देखील उघडकीस आणले आहेत. अशी माहिती रविवार दि. 23 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता पोलीस सुत्रांनी दिली. घनसावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंभारपिंपळगाव येथील ज्ञानेश्वर मधुकर दहीवाळ यांचे ज्वेलर्स चे दुकान फोडून 19 लाख 76 हजार 500 रुपयाच सोन्या चांदीचा मुद्देमाल चोरुन नेला होता.