नंदुरबार जिल्ह्यात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ अथवा पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी आज कार्यालयात माध्यमांशी बोलताना दिली आहे. राज्यात एका गावात सोशल मीडियावर व्हायरल पोस्टमुळे दोन गटात मोठा तणाव निर्माण झाला या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे याकरिता सोशल मीडियावर पोस्ट करताना काळजी घेण्या संदर्भात सूचना करण्यात आले आहेत.