गळफास घेऊन एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना जे.बी पार्क धामणगाव रेल्वे येथे घडली आहे. पुनम राजेंद्र ठोकळे वय वर्ष 38 असे मृतक महिलेचे नाव आहे. महालक्ष्मी पूजनाला तिचे दोन मुले अमरावती मामाकडे गेले असता, पती-पत्नी हे घरीच होते .राजेंद्र हा सकाळी त्याच्या गॅरेजवर गेला असता परत घरी जाऊन पाहिल्यानंतर त्याला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत पुनम ही आढळली .त्यांनी लगेच काही नागरिकांच्या मदतीने धामणगांव ग्रामीण रुग्णालय येथे उपचाराकरिता पुनम हिला आणले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.