पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात वेगाने वाढत असलेल्या मलकापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. शहरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून 41 लाख रुपयांच्या निधीची तरतूद त्यांनी करून घेतली आहे. आ. डॉ. भोसले यांच्या कार्यालयाच्यावतीने बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता याबाबतची माहिती देण्यात आली. कराड शहरानजिक असलेले मलकापूर हे सातत्याने वाढत जाणारे शहर आहे.