कांदा लागवडीसाठी लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामातील कांदा पिकविला परंतु योग्य दर न मिळाल्याने काही शेतकऱ्यांनी 'अत्यल्प' भावातच कांदा विकला. तर काही शेतकऱ्यांनी पावसाळ्यात दर वाढतील या आशेने चाळीत कांदा साठवून ठेवला. मात्र साठवलेला कांदा आता पूर्णपणे सडू लागला असून चाळीतून दुर्गंधीयुक्त सडलेल्या कांद्याचे पाणी बाहेर वाहताना दिसत आहे. सडलेला कांदा चाळीबाहेर काढून शेतकरी उकिरड्यावर फेकत आहेत.