मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदान, मुंबई येथे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहत असून, तेथे जेवणाच्या सोयीसाठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील गावोगावी एकच उत्साह पाहायला मिळाला. जिल्ह्यातून तब्बल पाच लाख चटणी-भाकरी ठेचा आज मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आले आहेत. मराठा बांधवांनी श्रमदान करून मोठ्या प्रमाणात भाकऱ्या तयार केल्या