लातूर : जागतिक टपाल दिनानिमित्त सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी जनतेसाठी खास पत्र लिहून एक आगळीवेगळी परंपरा जिवंत केली आहे. इंटरनेट, मोबाईल आणि सोशल मीडियाच्या युगात पत्रव्यवहार हरवत चालला असताना, मंत्री पाटील यांनी आपल्या हस्ताक्षरातील या पत्रातून ‘भावनिक संवादाचे महत्व’ अधोरेखित केले आहे.“पत्र हे केवळ संवादाचे माध्यम नाही, तर भावना पोहोचवणारे साधन आहे,” असे ते या पत्रातून म्हणतात. टपाल सेवेने राष्ट्राच्या एकात्मतेत आणि सामाजिक बांधणीमध्ये मोलाची भूमिका बजावली आहे.