गुहागरहुन सकाळी 7.45 वाजता सुटणारी गुहागर- परचुरी एस.टी. बस पांगारी सडेवाडी येथून विध्यार्थ्यांना घेऊन येत असताना सकाळी 9.15 वाजण्याच्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या एका बाजूला ही बस पूर्णपणे कलंडली. सुदैवाने यावेळी मोठा अनर्थ टळून कोणतीही जिवीतहानी झाली नाही. गुहागर -परचुरी एम.एच.14 बी टी.2438 ही बस नेहमीप्रमाणे सकाळी 7.45 वाजता गुहागर आगारातून चालक व्ही.एम.पाटोळे हे घेऊन परचुरीकडे आले.दरम्यान पांगारी सडेवाडी येथून विध्यार्थी व प्रवासी वर्गाला घेऊन येताना अपघात झाला