11 सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास ७० गोवंश जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना वाडी पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी वाहन , मोबाईल आणि जनावरे असा एकूण ४२ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विजय धुमाळ आणि पोलीस अंमलदार संजय यांना गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी छापा टाकला.पोलिसांनी वाहणाची तपासणी केली असता, त्यात तब्बल ७० जिवंत गोवंश आढळून आले.